नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम, निफाडचा पारा ९ अंशावर

थंडी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींमुळे जिल्ह्यातील थंडीचा कडाका कायम आहे. गुरूवारी (दि. १८) निफाडचा पारा ९ अंशावर स्थिरावला. तर नाशिकमध्येही ११.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हवेत गारवा अधिक असल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे. (Nashik Cold News)

उत्तरेमधील बहुतांक्ष राज्यांमध्ये पारा ५ अंशाखाली घसरला आहे. त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्याच्या हवामानावर झाला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. नाशिक शहर व परिसर पहाटे धुक्यात हरवत आहे. रात्रीच्या वेळी थंड वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने नाशिककर गारठले आहेत. दुसरीकडे गेल्या चार दिवसांपासून निफाडचा पारा १० अंशाखाली असल्याने अवघ्या तालूक्याला हूडहूडी भरली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातही थंडीचा जोर कायम आहे. दरम्यान, मध्य भारतात सध्याचे हवामान हे काेरडे आहे. त्यामुळे उत्तर भारताकडून येणारे शीत वारे वेगाने महाराष्ट्राकडे सरकत आहेत. परिणामी नाशिकसह राज्याच्या अन्य भागात थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम, निफाडचा पारा ९ अंशावर appeared first on पुढारी.