नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

सुनेवर अत्याचारप्रकरणी निवृत्त डीवायएसपीवर गुन्हा

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

लग्नाचे आमिष दाखवून तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने २४ वर्षीय युवतीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित युवती मोहाडी (ता. दिंडोरी) येथे राहते. संशयित आरोपी तेजस धनंजय पाटील (२९, रा. शीरसाड, ता रावल, जि जळगाव) येथील असून तो तिचा नातेवाईकही आहे. तो कामानिमित्त सातपूरमध्ये राहात आहे. पीडित युवती व तेजस यांची ओळख दोन वर्षांपूर्वी व्हाॅट्सॲपवरून झाली होती. त्या माध्यमातून झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन तेजसने तिला लवकरच आपण लग्न करू असे आश्वासन दिले होते. त्याने तिला दि. ३१ जानेवारी २०२२ रोजी फोन करून सातपूर येथे बोलावून एका हॉटेलमध्ये नेले व शरीरसंबंध ठेव, नाहीतर मी लग्न करणार नाही अशी धमकी देत, तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिने वर्षभरापासून तेजसला आपण लग्न करू, असा आग्रह धरला. परंतु त्याने २ ते ३ महिन्यांत लग्न करू असे सांगत टाळाटाळ केली. याच दरम्यान त्याने पुन्हा तिला द्वारका येथील एका लॉजवर नेत दोघांचे विवस्त्र अवस्थेतील फोटो दाखवित ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केला, अशी माहिती पीडितेने दिली. पीडितेच्या माहितीनुसार घटनेतील संशयित आरोपी तेजस पाटीलवर सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सातपूर पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार appeared first on पुढारी.