नाशिक : लाच स्वरुपात हॉटेलमध्ये पार्टी घेणारा गजाआड

नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सातबारा उताऱ्यावर तक्रारदारांच्या वडिलांचे नाव लावून दिल्याचे मोबदल्यात हॉटेल पार्टी करीत बिलाचे पैसे घेतल्याप्रकरणी एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. रवींद्र कारभारी मोरे (४२, रा. चांदवड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

संशयित मोरे हा तलाठी कार्यालयात खासगी मदतनीस म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. चांदवडमधील ३१ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय असून त्यासाठी त्यांनी त्यांच्या वडीलांच्या नावे ५० गुंठे जमीन विकत घेतली होती. या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार यांच्या वडिलांचे नाव लावून दिल्याचे मोबदल्यात संशयित रवींद्र मोरे हॉटेलमध्ये पार्टी केल्याचे सांगत बिलाचे दोन हजार ९४० रुपये बक्षीस स्वरुपात मागितले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून संशयितास पकडले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे, कर्मचारी एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे व परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा : 

The post नाशिक : लाच स्वरुपात हॉटेलमध्ये पार्टी घेणारा गजाआड appeared first on पुढारी.