नाशिक : वार्सा फाट्यावर ९७ हजारांचा गुटखा जप्त ; पिंपळनेर पोलिसांची कारवाई

गुटखा जप्त,www.pudhari.news

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर पोलिसांनी साक्री तालुक्यातील वार्सा फाट्यावर 97 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळनेरचे प्रभारी पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार पथकाने सात वाजेच्या सुमारास वार्सा फाट्यावर सापळा रचला. संशयित मोहम्मद अंनिस मोहम्मद हनिफ मोमीन (इस्लामपुरा, मालेगाव) वाहन घेऊन येतांना दिसला. त्याला थांबण्याचा इशारा केल्यावर वाहन रस्त्याच्या कडेला लावून तो घटनास्थळावरून पसार झाला. वाहनाच्या तपासणीत 94 हजारांचा गुटखा व तीन हजारांचा तंबाखू असा एकुण 97 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.

अधिक तपासात पथकाने मोहम्मद मोईम याला ताब्यात घेतले असून अन्न व औषध प्रशासनातील सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक एस.हृषीकेश रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली बी. जी.शेवाळे, किशोर बाविस्क, रवींद्र सूर्यवंशी, सोमनाथ पाटील, नरेंद्र माळी यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा :

The post नाशिक : वार्सा फाट्यावर ९७ हजारांचा गुटखा जप्त ; पिंपळनेर पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.