नाशिक : विंचूरला अजित पवार यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने आंदोलन

विंचूर आंदोलन www.pudhari.news

नाशिक (विंचूर) : पुढारी वृत्तसेवा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी बोलत असतांना ‘संभाजीराजे कधी धर्मवीर नव्हते’ असे चुकीचे वक्तव्य केल्यामुळे त्याचा निषेध नोंदविण्यात आला. मंगळवारी (दि.3) विंचूर येथे भाजपा लासलगाव मंडलच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.

आंदोलनप्रसंगी बोलतांना भाजपच्या नाशिक जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुवर्णा जगताप यांनी अजित पवार यांच्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीने धर्मवीर संभाजी राजे महाराज यांच्याबद्दल अविवेकी वक्तव्य करणे अशोभनीय असल्याचे नमूद केले. तर आंदोलनकर्त्यांनी “संभाजी महाराज की जय, माफी मागा माफी मागा, होश में आओ होश में आओ, अजित पवार यांचा निषेध असो…” अशा घोषणा देत अजित पवार यांनी तत्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावेळी भाजपा ओबीसी सेलचे नेते कैलास सोनवणे, संजय शेवाळे, मंडल महिला अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सरचिटणीस निलेश सालकडे, किरण कुलकर्णी, काका दरेकर, नवनाथ संभेराव, पांडुरंग शिरसाठ, ओम शेवाळे, जैन प्रकोष्टचे अध्यक्ष मनीष चोपडा, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर देसले, बापू दरेकर, गोरख गांगुर्डे, अभिषेक घोटेकर, गंगाधर गोरे, बाळासाहेब नेवगे, स्वाती जोशी, शैलजा भावसार, मनीषा हरळे, सचीन शिंदे, साहेबराव खलसे, संजय गडाख, गोरख सोनवणे, सुनील नेवगे, सोनू आब्बड, ज्ञानेश्वर शिरसाठ, भारती महाले, रेखा महाले, निर्मला साळवे, मंजाबाई देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : विंचूरला अजित पवार यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने आंदोलन appeared first on पुढारी.