नाशिक : वीटभट्टी मजुराचा मारहाणीत मृत्यू

मारहाण

नाशिक (घोटी) : दोघा जणांनी मिळून वीटभट्टी मजुराला बेदम मारहाण करून ठार केले व त्याचे प्रेत मुंढेगाव – अस्वली रेल्वेस्थानक रस्त्यावरील गरुडेश्वर येथील मरीमाता मंदिराजवळ फेकल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, घोटी परिसरातील वांगेवाडी येथील वीटभट्टीवर मजूर म्हणून कामाला असलेल्या संपत मुकणे (34) यास संशयित बुधा वळवी व शंकर वळवी या दोघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत संपत कोकणे याच्या जिव्हारी मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही संशयितांनी मृत संपत मुकणे याचे प्रेत गरुडेश्वर शिवारात मुंढेगाव अस्वली रेल्वेस्थानकावर असलेल्या मरिमाता मंदिराजवळ फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत मृताची आई शांताबाई मधू मुकणे यांनी वाडीवर्‍हे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : वीटभट्टी मजुराचा मारहाणीत मृत्यू appeared first on पुढारी.