नाशिक : शहरातील प्रभाग सात बनणार पहिला “क्वालिटी प्रभाग’

क्वालिटी प्रभाग नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेल्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या स्वायत्त संस्थेने क्वालिटी सिटी उपक्रमाअंतर्गत नाशिक शहराची निवड केली असून, पहिल्या क्वालिटी प्रभागाचा मान गंगापूर रोड येथील प्रभाग क्र. ७ ला देण्यात आला आहे. या संदर्भातील प्रभाग ७ मधील मान्यवरांची नुकतीच पंडित कॉलनी येथील लायन्स क्लब सभागृहात बैठक पार पडली. बैठकीला माजी नगरसेवक अजय बोरस्ते यांच्या वतीने मनपा आयुक्त भाग्यश्री बानायत, जितू ठक्कर, हेमंत राठी, आरोग्य अधिकारी कल्पना कुटे, कृणाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया नाशिक महापालिकेसह शहरातील विविध संस्था आयएमए, निमा, क्रेडाई यांच्या साथीने शहराला स्वच्छ, सुंदर व सर्वोत्तम कसे बनवता येईल याबाबतचा आराखडा तयार केला असून, तीन स्तरांत याची विभागणी केली आहे. त्याअंतर्गत शिक्षण, कौशल्य विकास आणि स्वच्छता या त्रिसूत्रीत काम करून गुणवत्ता वाढवली जाणार आहे. प्रभाग क्र. ७ गंगापूर रोड हा अशोक स्तंभ, पोलिस वसाहत, पंडित कॉलनी, लोकमान्य नगर, गार्डन होम सोसायटी, गंगापूर नाका, मंगलनगर, सहदेवनगर, पंपिंग स्टेशन या लोकवस्तींचा परिसर आहे. यात स्लमपासून ते उच्चभ्रू सोसायटी यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रभागात काम करण्याच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

बैठकीस प्रभागातील आबा पाटील, साई पाटील, कैलास लोणे, जानकीदास कोल्हे, सचिन गुळवे, संजय निकम, हेमंत मालपाणी, मनोज शर्मा, अजित बुरकुल, हेमंत शिंदे, अमोल जोशी, कल्पना धटिंगण, क्षेमकल्याणी, देवशाली साबळे, सरला गायकवाड, राहुल लोया, स्नेहल अहिरराव, दिलीप भामरे, प्रसन्ना तांबट, आनंद फरताळे, दीपक हांडगे, संजय घोडके, हर्षल पाटील, समीर देवघरे, विशाल खैरनार, बबन धनवटे तसेच पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर, दयानंद आहेर, अजय खोजे, दिलीप चव्हाण, गोसावी, प्रशांत बोरसे, शंतनू बोरसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कृणाल पाटील यांनी मानले.

हेही वाचा : 

The post नाशिक : शहरातील प्रभाग सात बनणार पहिला "क्वालिटी प्रभाग' appeared first on पुढारी.