नाशिक : शहरात शस्त्र बाळगणारे गजाआड

अटक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शस्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार संशयितास खंडणीविरोधी पथकाने पकडले आहे. योगेश रघुनाथ मराठे (रा. पाथर्डी फाटा) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. अंबड पोलिस ठाण्यात याआधी संशयित मयूर रामदास गांगुर्डे (28) याच्याविरोधात शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात संशयित योगेश मराठे हादेखील सहभागी होता, मात्र तो फरार झाला होता. त्यामुळे खंडणीविरोधी पथक त्याच्या मागावर होते. पथकाने योगेशला दत्तनगर, चुंचाळे परिसरातून पकडून त्याचा ताबा अंबड पोलिसांकडे दिला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, अंमलदार दिलीप सगळे, किशोर रोकडे, दत्तात्रेय चकोर, योगेश चव्हाण, स्वप्नील जुंद्रे, विठ्ठल चव्हाण आदींनी ही कामगिरी केली.

हेही वाचा:

The post नाशिक : शहरात शस्त्र बाळगणारे गजाआड appeared first on पुढारी.