नाशिक : शिंगाडा तलाव दंगल प्रकरणी १५ संशयितांना अटक

अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिंगाडा तलाव येथे कार डेकोर व्यावसायिक आणि कामगारांमधील वादानंतर उसळलेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील १५ संशयितांना अटक केली. त्याचप्रमाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर विनापरवानगी आंदोलन करणाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंगाडा तलाव परिसरात कार डेकोर व्यावसायिक व कामगारांच्या वादातून शुक्रवारी (दि. ७) वाद झाला होता. दोन्ही गटांतील जमावाने धारदार शस्त्रे, दगड, दांडके यांचा वापर करीत एकमेकांवर हल्ला केला. यात तिघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी राहुल राऊत, मनोज राऊत, उमेश राऊत, प्रभाकर डेकोरचे मालक प्रवीण, विनोद थोरात, कौशल्य वाकरकर, तुकाराम राठोड यांच्यासह चावी तयार करणारा अहमद, नाजीम पिरजादे, अन्वर शेख, अज्जू मामू उर्फ अजहर, परवेज निसार शेख, मोबीन, जैनुल आबेदीन सलाउद्दीन मौलवी, आरबाज, दानिश, शोएब, फरहान, शाहरूख, प्रेम, अशपाक व त्याच्या १० ते १५ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करून १५ जणांना अटक केली आहे. संशयितांना मंगळवार (दि. ११) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दंगल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर विनापरवानगी निदर्शने केली त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी संशयित नंदू कहार, अक्षय कलंत्री, कैलास देशमुख, किशोर ऊर्फ गज्जू गोपाल घोडके, योगेश बहाळकर, श्रीकांत क्षत्रिय, स्वप्निल शाहू, अतुल जा‌धव यांच्यासह इतर 10 कार्यकर्त्यांवर सरकारवाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : शिंगाडा तलाव दंगल प्रकरणी १५ संशयितांना अटक appeared first on पुढारी.