नाशिक : श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे यांना सुविचार गौरव पुरस्कार

श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सुविचार गौरवच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून, यावेळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांना गौरविले जाणार असल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली. येत्या दि.3 मे रोजी सायंकाळी 5 ला सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण महाकवी कालिदास कलामंदिर येथे करण्यात येणार असून, खा. शरद पवार यांच्या हस्ते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली वितरण पार पडणार आहे. यावेळी अवयवदान चळवळीचे प्रणेते डॉ. भाऊसाहेब मोरे (सुविचार जीवन गौरव), शेतकरी नेते रामचंद्र पाटील (सामाजिक), डॉ. शेफाली भुजबळ (शैक्षणिक), दत्ता पाटील (साहित्य), उद्योजक चंद्रशेखर सिंग (उद्योग), संगीता बोरस्ते (कृषी), मार्शल आर्ट, महिला कुस्ती संघ खेळाडू गौरी घाटोळ (क्रीडा), प्रा. नानासाहेब दाते (सहकार) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गोरवाडकर व प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी पुरस्कार निवड समितीचे काम बघितले.

हेही वाचा:

The post नाशिक : श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे यांना सुविचार गौरव पुरस्कार appeared first on पुढारी.