नाशिक : समता-शिवा पुरस्कारासाठी 3 एप्रिलपर्यंत करा अर्ज

समता शिवा पुरस्कार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागामार्फत दरवर्षी अक्षयतृतीयेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येतो.

या पुरस्कारासाठी 2023 या वर्षासाठी प्रस्ताव 3 एप्रिलपर्यंत सादर करावे, असे आवाहन नाशिक समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे. राज्यातील वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कलात्मक समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणार्‍या समाजसेवक, संस्था, कलावंत, संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक यातून एक व्यक्ती व एका संस्थेला हा पुरस्कार महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी अक्षयतृतीयेला देण्यात येतो. पुरस्कारासाठी नियमानुसार पात्र असणार्‍या व्यक्ती आणि संस्था यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव 3 प्रतीत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नाशिक कार्यालयात 3 एप्रिलपर्यंत सादर करावे, असेही वसावे यांनी कळविले आहे. तसेच प्रस्ताव पाठविण्याबात काही अडचणी असल्याचे किंवा अधिक माहितीसाठी समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त येथे संपर्क करावा.

हेही वाचा:

The post नाशिक : समता-शिवा पुरस्कारासाठी 3 एप्रिलपर्यंत करा अर्ज appeared first on पुढारी.