नाशिक : ‘सावाना’तर्फे 26 शिक्षकांना पुरस्कार जाहीर

www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सार्वजनिक वाचनालय, नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समितीतर्फे देण्यात येणारे शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते 26 शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. 15 ते 21 सप्टेंबर 2022 दरम्यान पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी सुरू केलेला शिक्षक पुरस्कार सोहळा वाचनालयाची नागरिक शिक्षक गौरव समिती दरवर्षी करीत असते. समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र निकम, कार्यवाह डॉ. धर्माजी बोडके, प्रा. हरिष आडके, प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, प्रा. डॉ. दिलीप बेलगावकर आदींनी समितीचे काम पाहिले.

पुरस्कारार्थी असे….
प्राथमिक विभाग – राजेश बाबुलाल अमृतकर, शीतल बापूराव कारवाळ, नंदलाल वसंतराव धांडे, शोभा नीळकंठ सोनवणे.

माध्यमिक विभाग – सुरेखा अशोक बोहाडे , सचिन मधुकर चांगटे, वंदना बापूराव खैरनार, सुरेखा संजय सोनवणे.

उच्च माध्यमिक विभाग – विष्णू वामन उगले महाविद्यालयीन – डॉ. प्रसाद सुधाकर कुलकर्णी, डॉ. मृणालिनी दिलीप देशपांडे, डॉ. पोपट विठ्ठल कोटमे.

संत साहित्य- डॉ. रामकृष्ण गवळीराम गायकवाड ऊर्फ विद्या वाचस्पती डॉ. रामकृष्ण लहवितकर महाराज.

क्रीडा – अर्जुन हरी सोनकांबळे.

कला – प्राजक्ता चिरायू भट.

विशेष चित्रकला- माधुरी विजय निफाडे.

शास्त्रीय संगीत – मीरा पंडित नलावडे.

मुख्याध्यापक – संगीता मकरंद मळ्ळीकर.

विशेष कार्य – योगाचार्या डॉ. प्रज्ञा सुनील पाटील, नाशिक, डॉ. प्रवीण घोडेस्वार.

सेवानिवृत्त प्राथमिक- मालती दिलीप कराड.

माध्यमिक – चंद्रशेखर वाड.

महाविद्यालयीन- विजय विठ्ठल मोरजकर.

व्यावसायिक विद्या शाखा- मृदुला हेमंत देशमुख-बेळे.

संशोधक अध्यापक – डॉ. कल्याणराव चिमाजी टकले.

लोककला – रवींद्र कदम.

हेही वाचा:

 

The post नाशिक : ‘सावाना’तर्फे 26 शिक्षकांना पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.