नाशिक : सिडकोत १६ कारच्या काचा फोडल्या, दोन जण पोलिसांच्या ताब्यात

सिडको क्राईम,www.pudhari.news

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सिडकोत पुन्हा कारच्या काचा फोडण्याचा प्रकार घडला आहे. सिडकोतील त्रिमुर्ती चौक तसेच हेडगेवर चौकात मंगळवारी मध्यरात्री पार्किग केलेल्या १६ कारच्या काचा फोडण्यात आल्या. याप्रकरणी अर्ध्या तासात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सिडकोतील त्रिमुर्ती चौक तसेच हेडगेवार चौकात मंगळवारी रात्री १ ते २ च्या दरम्यान हा प्रकार घडला.  अज्ञात समाज कंटकांनी घरासमोर तसेच मैदानात पार्किंग केलेल्या कारच्या काचा फोडल्याने मोठे नुकसान झाले आहे.  नागरिकांमध्ये याप्रकारामुळे घबराट पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले सहकारी समवेत घटना स्थळी दाखल झाले. घटनेचा तपास करून अवघ्या दोन तासात त्यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलसि यासंदर्भात अधिक तपास करित आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : सिडकोत १६ कारच्या काचा फोडल्या, दोन जण पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.