नाशिक : सैनिकी वसतिगृह प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत मुदत

सैनिकी वसतीगृह www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी जिल्हा सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिकांच्या वीरपत्नी व सेवारत सैनिक यांनी आपल्या पाल्यांच्या वसतिगृह प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी केले आहे. सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इच्छुक पालकांनी प्रवेशासाठी संबंधित वसतिगृहातून प्रवेश अर्ज व माहिती पत्र घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांसह वसतिगृह अधीक्षक व अधीक्षिका यांच्याकडे दिलेल्या मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. मुला-मुलींच्या प्रवेशासंबंधी वसतिगृह व्यवस्थापन समितीची बैठक दि. ४ जुलै रोजी सकाळी 11 ला सैनिकी मुलांचे वसतिगृह, शासकीय दूध डेअरीजवळ, पत्रकार कॉलनी, त्र्यंबक रोड, नाशिक येथे आयोजित केली आहे. सर्व पालकांनी व प्रवेश घेणाऱ्या पाल्यांनी सैन्यातील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक/सैनिक वीरपत्नी असल्याबाबतचे ओळखपत्र, ECHS कार्ड इत्यादी सोबत आणावे, असेही सोनवणे यांनी कळविले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सैनिकी वसतिगृह प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत मुदत appeared first on पुढारी.