नाशिक : होळकर पूल ते आनंदवली गोदापात्राची स्वच्छता मोहीम

पाणवेली हटविण्याचे काम,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेतर्फे अहिल्यादेवी होळकर पूल ते आनंदवली या दरम्यान गोदावरी नदीपात्राची ट्रॅश स्किमर म’शीनद्वारे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. दररोज सुमारे आठ ते दहा टन पाणवेली हटविण्याचे काम सुरू आहे.

आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार आणि उपआयुक्त तथा गोदावरी संवर्धन कक्षप्रमुख डॉ. विजयकुमार मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी पात्राची स्वच्छता मोहीम सुरू आहे. सध्या चांदशी शिवार येथे पाणवेली काढण्याचे काम सुरू आहे. आनंदवलीपर्यंत नदीपात्रातील संपूर्ण पाणवेली काढण्याचे काम सुरू राहणार आहे. सुरुवातीला शहरातील होळकर पूल, घारपुरे घाट तसेच चोपडा लॉन्स परिसरात क्रॅश स्कीमर मशीनद्वारे पाणवेली काढण्यात आली. स्मार्ट सिटीकडून होत असलेल्या या कामावर आता महापालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्षाचे नियंत्रण राहणार आहे. गोदावरी नदी आणि तिचे पात्र नितळ, स्वच्छ राहण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासह सामाजिक संस्था, एनसीसी कॅडेट्स यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिमा राबविल्या जात आहेत. तसेच प्लास्टिक बंदीबाबतही जनजागृती करण्यात आली होती. यापुढेही सातत्याने स्वच्छता मोहीम राबवून, जनजागृती करून गोदापात्र स्वच्छ ठेवण्याची दक्षता घेतली जाणार असल्याचे उपआयुक्त तथा गोदावरी संवर्धन कक्षप्रमुख डॉ. विजयकुमार मुंढे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post नाशिक : होळकर पूल ते आनंदवली गोदापात्राची स्वच्छता मोहीम appeared first on पुढारी.