नाशिक : अंबड येथे पेंट शोरूमला आग

सिडको www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहत येथील पेंट शोरूमला गुरुवारी (दि. 15) दुपारी अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सिडको व अंबड अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले.

गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास ऑटोमोटिव्ह शोरूमसमोरील पेंट शोरूमला आग लागली होती. सिडको व अंबड एमआयडीसीच्या अग्निशामक बंबांनी पाणी मारून आग विझवली. यावेळी सिडको केंद्राचे केंद्रप्रमुख आर.ए.लाड, लीडिंग फायरमन प्रमोद लहामगे, श्रीराम देशमुख, सिद्धार्थ भालेराव, वाहनचालक नंदू व्यवहारे, एमआयडीसी अग्निशामक दलाचे एस. एस. फुले, के. जी. घुगे, ब्राह्मणकर या कर्मचा-यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत पेंट शोरूममधील संपूर्ण पत्र्याचे शेड, कलर व इतर रॉ मटेरियलचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट झाले नाही.

हेही वाचा:

The post नाशिक : अंबड येथे पेंट शोरूमला आग appeared first on पुढारी.