निऑन कलरमध्ये साकारली जातेय हुबेहुब छत्रपती शिवरायांची छबी

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अशोक स्तंभ मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक व्यंकटेश मोरे यांच्या संकल्पनेतून 65 फूट उंच, तर 22 फूट रुंद अशी भव्य शिवरायांची मूर्ती साकारण्यात येत आहे. या मूर्तीसाठी 4 टन स्टील, 3 टन फायबर, 550 किलो तसेच निऑन कलरचा वापर केला जात आहे. यातील छत्रपती शिवरायांच्या गळ्यातील रुद्राक्ष माळ 50 मण्यांची, तर कवड्यांची माळ 31 मण्यांनी असणार आहे. त्यामुळे मूर्तीचे एकूण वजन 7 टन इतके आहे. त्र्यंबक रोड परिसरात गेल्या महिन्याभरापासून मूर्तिकार हितेश पाटोळे व हेमंत पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली 30 कारागीर ही मूर्ती घडविण्याचे काम अहोरात्र करत आहेत. (छाया : हेमंत घोरपडे)

पहा फोटो…

The post निऑन कलरमध्ये साकारली जातेय हुबेहुब छत्रपती शिवरायांची छबी appeared first on पुढारी.