पंतप्रधान मोदींकडून नाशिककरांना मोठ्या अपेक्षा

आसिफ सय्यद

नाशिक :  राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.12) नाशिक दौर्‍यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करतात, याकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागून आहे. प्रभू श्रीरामांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतून मोदी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना नाशिकला काय भेट देतात, याचीच उत्सुकता आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेला पंतप्रधान मोदींचा दौरा ऐतिहासिक ठरणार आहे. यापूर्वी 2014 आणि 2019 च्या निवडणुकांपूर्वी झालेली मोदींची सभा भाजपला घवघवीत यश देणारी ठरली होती. नाशिकने नेहमीच मोदींवर प्रेम व्यक्त केले आहे. नाशिक शहरातील भाजपचे तीनही आमदार आणि युतीचा खासदार नाशिककरांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच दिला आहे. त्यामुळे नाशिककरांच्या अपेक्षाही मोठ्या आहेत.

या आहेत अपेक्षा…

नाशिक-त्र्यंबकेश्वर धार्मिक कॉरिडोअर
देशातील पहिली एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो निओ प्रकल्प
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाचे भूसंपादन
नमामि गोदा प्रकल्प, मलनिस्सारण प्रकल्प
विमानसेवेचे विस्तारीकरण
दत्त मंदिर ते द्वारका डबल डेकर उड्डाणपूल
नाशिक-मुंबई महामार्गाचे विस्तारीकरण व काँक्रिटीकरण
आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, मल्टी मॉडेल हब
रामायण सर्किटसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा
गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरती
फूड प्रोसेसिंग हब

The post पंतप्रधान मोदींकडून नाशिककरांना मोठ्या अपेक्षा appeared first on पुढारी.