पिंपळनेर : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन 

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर (ता. साक्री) : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी समाजातील मुलांचे शिक्षण थांबू नये, याकरिता शालेय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह तसेच आश्रमशाळा इमारतीसाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत साक्री तालुक्यातील सुकापूर, वार्सा येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह इमारतीच्या भूमिपुजनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार आशा गांगुर्डे, गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ना. डॉ. गावित म्हणाले, आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या संगोपन, जेवण, संरक्षण यांसाठी रोजंदारी तत्त्वावरील कार्यरत ५२ वर्ग चारचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या संगोपन, कर्मचारी यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृह इमारतीमुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाबरोबरच राहण्याची व्यवस्थासुद्धा चांगली होणार आहे. शासकीय लाभाबरोबरच शिक्षणाकडेही लक्ष दिले पाहिजे. शासकीय आश्रमशाळा, वार्सा या शाळेचा निकाल सलग पाच वर्षे १०० टक्के लागत आहे, ही आनंददायी बाब असल्याचेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना दिली पारितोषिके

फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथे पार पडलेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वार्सा शाळेतील १२ मुले व १६ मुली अशा एकूण २८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यातून २४ खेळाडूंना राज्यस्तरीय प्रावीण्य प्राप्त झाले आहे. त्या विद्यार्थ्यांना ना. डॉ. गावित यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन  appeared first on पुढारी.