भुसावळात दोन गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त, तिघांना अटक

शिकारीचा गुन्हा दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दोन गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस व दोन चॉपर बाळगणार्‍या व विक्री करणार्‍या साकेगावातील दोघांसह भुसावळातील एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख राजू पटेल (25, आंबेडकरनगर, साकेगाव, ता. भुसावळ) व विकास पांडुरंग लोहार (30, श्रीरामनगर, साकेगाव, ता. भुसावळ) व जयसिंग ऊर्फ सोनू रायसिंग पंडित (26, वाल्मीकनगर, भुसावळ) अशी अटकेतील तीन आरोपींची नावे आहेत. जळगाव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील हवालदार सूरज पाटील, हवालदार रमण सुरळकर, नाईक यासिन पिंजारी आदींच्या पथकाने बुधवारी (दि. 3) ही कारवाई पार पाडली.

हेही वाचा:

The post भुसावळात दोन गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त, तिघांना अटक appeared first on पुढारी.