मंडळ आयोग गेला तर यांचे आरक्षण राहील का? 

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आणि ओबीसी आरक्षण वादामध्ये मनोज जरांगे-पाटील यांनी मंडल आयोगाला आपण चॅलेंज करण्याचे वक्तव्य नाशिकमध्ये केले होते. याला प्रत्युत्तर देताना ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या या मागणीला आमचा पाठींबा आहे. झुंडशाही आणि बॅक डोअर एन्ट्रीला विरोध आहे. ओबीसी आरक्षण मंडळ आयोगाचा भाग आहे. जर मंडळ आयोग गेला तर त्यांचे आरक्षण राहील का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मंत्री भुजबळ म्हणाले की, मुंबईतील दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा या स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. याबाबत, भुजबळ म्हणाले की, लोकांच्या डोक्याला झालंय काय? मला कळत नाही, फेसबुक लाईव्ह करतात आणि अशा घटना घडतात. यात पोलीस तरी काय करणार, चोऱ्या दंगल अशा घटनांमध्ये पोलीस संरक्षण देत असतात, इथं तुमच्या घरात येऊन घटना घडतात. पोलिसांनी बंदूक लायसन्स देताना अधिक काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, बाबा सिद्धीकी यांच्याबाबत भुजबळ यांनी, बाबा सिद्धीकी राज्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या येण्याने पक्षाला फायदा होणार आहे. त्यांना राज्यसभेची उमेदवारी देणार की नाही याची कल्पना नाही. मी सुद्धा राज्यसभेसाठी इच्छुक आहे, याची कल्पना नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा :

The post मंडळ आयोग गेला तर यांचे आरक्षण राहील का?  appeared first on पुढारी.