महापरिनिर्वाण दिन : धुळयात “एक वही-एक पेन” अर्पण करत अनोखी आदरांजली

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आदरांजली वाहण्यासाठी येत असताना फुल-हार, मेणबत्ती, अगरबत्ती व इतर नाशवंत वस्तूंना न आणता “एक वही व एक पेन” सोबत आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी असे अभिवादन करूया असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि. 6) महापरिनिर्वाण दिनी हजारो वही पेन संकलित करण्यात आले.

महापरिनिर्वाण दिनी धुळे शहरातील डॉ. आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्याजवळ हजारो अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी येतात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानंतर अनेक अनुयायांनी या ठिकाणी हजारो वही, पेन व शालेय वस्तू या ठिकाणी देऊन या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. महामानव यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे वही पेन जर त्यांच्या चरणी वाहिली. तर ही डॉ. आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल, असे आवाहन करण्यात आले. वही पेनची चळवळ झालेले अभियान मागील तीन वर्षापासून धुळे शहरात चालवले जात असून या ठिकाणी जमा झालेल्या वही व पेन सर्वच समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन वाटप करण्यात येते. यातुन त्यांच्या शिक्षणाला हातभार लागेल, या उद्देशानेच हे अभियान राबविले जात आहे.

या अनोख्या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची दखल आज धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, नगरसेवक नागसेन बोरसे, नाना साळवे, रणजीत भोसले, किरण जोंधळे, धीरज पाटील, शशिकांत वाघ, नागसेन बागुल, एस.यु. तायडे, नगरसेविका वंदना भामरे यांनी दखल घेतली. त्यांनी देखील वही व पेन या ठिकाणी अर्पण केले. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विशाल पगारे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण ईशी, उत्तर महाराष्ट्र संघटक हेमंत पवार ,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष लखन साळवे, जिल्हा उपाध्यक्ष भैय्या खरात, शहराध्यक्ष नागेंद्र मोरे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सुगत मोरे, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष मज्जित मदारी, रोहित म्हसदे, राहुल पवार, सचिन खरात, अजय पगारे, दादा पगारे, सुनील पगारे, समाधान भामरे, वृंदावन पवार, मनोज नेरकर, पंकज गायेकावड, यश म्हासदे, ईश्वर घोरपडे, मयूर बेडसे, दीपक जाधव, बंटी पगारे आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

The post महापरिनिर्वाण दिन : धुळयात "एक वही-एक पेन" अर्पण करत अनोखी आदरांजली appeared first on पुढारी.