मृत जनावरांची विल्हेवाटही आता खासगीकरणातून,

मृत जनावरांची विल्हेवाट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- घंटागाडीद्वारे घरोघरी केरकचऱ्याचे संकलन व विल्हेवाट, साफसफाईचे आउटसोर्सिंग करणाऱ्या नाशिक महापालिकेने आता शहरात मृत होणारी जनावरे उचलणे व खतप्रकल्पावर विल्हेवाट लावण्याचे कामही खासगीकरणातून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन वर्षे मुदतीचा ठेका दिला जाणार आहे. यासंदर्भातील १.२७ कोटींच्या खर्चास महासभेने मंजुरी दिली आहे.

घंटागाड्यांमार्फत घरोघरी केरकचरा संकलन व खतप्रकल्पावर वाहून नेण्यासाठी महापालिकेने ३५४ कोटींचा पाच वर्षे मुदतीचा ठेका दिला आहे. सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे ७०० सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील दोन विभाग तसेच गोदाघाटावरील साफसफाईचे कामही आउटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्यात येत आहे. रस्ते स्वच्छतेसाठी रोड स्विपिंग मशीन खरेदी करण्यात आल्या असून, खासगी मक्तेदाराच्या माध्यमातून या यांत्रिकी झाडूंचे संचलन करण्यात येत आहे. आता शहरातील मृत जनावरे उचलणे आणि खतप्रकल्पावर नेऊन विल्हेवाट लावण्याचे कामही खासगी एजन्सी नेमून करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी एक वर्षाकरिता ४२.५३ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यानुसार तीन वर्षांकरिता १.२७ कोटींच्या खर्चास महासभेने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

हेही वाचा :

The post मृत जनावरांची विल्हेवाटही आता खासगीकरणातून, appeared first on पुढारी.