विदेशवारीत झिरवाळ दाम्पत्याने जपला साधेपणा

नरहरी झिरवाळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ हे नुकतेच राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित अभ्यास दौऱ्यासाठी जपान येथे गेले. जाण्यापूर्वी त्यांनी विमानतळावर पत्नीसोबत छायाचित्र काढले आणि सोशल माध्यमांवर अपलोड केले. दैनंदिन पेहरावात असलेल्या झिरवाळ दाम्पत्याचे छायाचित्र नेटिझन्सला चांगलेच भावले आहे. अनेकांनी आपल्या संस्कृतीचे रक्षण करणारे दाम्पत्य अशी पुष्टी त्याला जोडली आहे.

दरम्यान, राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे ११ ते २३ एप्रिल या कालावधीत जपान या देशामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांसमवेत अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे, या दौऱ्याच्या निमित्ताने जपान येथे रवाना होताना, असे वैयक्तिक व्टिटर हँडलवर झिरवाळ यांनी पोस्ट केली आहेे.

यापूर्वी देखील झिरवाळ यांनी ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन आपल्या वागण्यातून घडविले आहे. संबळ नृत्यावरील त्यांचा ठेका असो किंवा आदिवासी पारंपरिक नृत्य असो तसेच ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ स्वत: बनविणे असो या सगळ्यातूून झिरवाळांनी संस्कृती जपली आहे.

हेही वाचा : 

The post विदेशवारीत झिरवाळ दाम्पत्याने जपला साधेपणा appeared first on पुढारी.