शिवसेनेच्या ‘त्या’ मतांवर भाजपचा डोळा, विनोद तावडेंनी सांगितलं भाजपचं लक्ष्य

विनोद तावडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेला हिंदुत्व आणि राम मंदिर या मुद्द्यांवर मागील निवडणुकीत 19 टक्के मते मिळाली. मात्र आता हिंदुत्व सोडल्यामुळे शिवसेनेला ही देखील मते मिळणार नाही. हीच मते भाजपकडे वळविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.

नाशिक येथे भाजपची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, मागील निवडणुकीत भाजपला 28 टक्के, शिवसेनेला 19 टक्के, काँग्रेसला 18 टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसला 17 टक्के मते मिळाली होती. आता या तिन्ही पक्षांची मते भाजपकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. 45 ते 50 टक्के मतदार आपल्याकडे कसे वळतील यासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी ही प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वावर लोक विश्वास  ठेवतील असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला.

The post शिवसेनेच्या 'त्या' मतांवर भाजपचा डोळा, विनोद तावडेंनी सांगितलं भाजपचं लक्ष्य appeared first on पुढारी.