श्री शिवमहापुराण सोहळ्यात महिलांनी गमावले 60 तोळे दागिने

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा; पाथर्डी गाव येथे श्री शिवमहापुराण कथा सोहळ्यात गुरुवारी (दि. 23) आणखी सात महिलांचे सुमारे 11 तोळे दागिने लपांस झाले. तीन दिवसांत एकूण सुमारे 55 ते 60 तोळे दागिने लंपास झाल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांनी दिली.

श्री शिवमहापुराण कथेसाठी मंगळवारी (दि. 21) हजारो महिलांनी हजेरी लावली. शहर, जिल्ह्यासह मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने महिलावर्ग येथे आला होता. कथा सोहळ्याला येताना महिलांनी दागिने परिधान करू नये, असे आवाहन आयोजन समितीसह पोलिस प्रशासनाने वारंवार सांगूनही महिला सोन्याचे दागिन्यात नटूनथटून येत आहेत. मंगळवारपर्यंत एकूण ४३ महिलांची सोनसाखळी, मंगळसूत्र चोरीला गेल्याची तक्रारी पोलिसांकडे नोंदविण्यात आल्या. त्यापैकी १४ महिलांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मंगळसूत्र सोनसाखळी चोरी गेल्याचा गुन्हा नोंदविला आहे. तर बुधवारी आणखी पाच ते सहा महिलांचे दागिने लंपास झाले. त्यामुळे तीन दिवसांत सुमारे 55 ते 60 तोळे सोने लंपास झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वीस जण बेपत्ता

कथेच्या ठिकाणाहून गुरुवारी २० लहान मुलांपासून वृद्ध बेपत्ता झाले होते. पोलिसांनी शोध घेऊन लहान मुलांना पालकांच्या, तर वृद्धांना त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

कथेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने आनंद होत आहे. परंतु स्थानिक रहिवाशांना व पदाधिकाऱ्यांना प्रवेश मि‌ळत नाही. पाथर्डी पंचक्रोशीतील भाविकांना, रहिवाशांनाही या सर्वांचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला पाहिजे व त्यांची नाराजी दूर व्हायला पाहिजे.

-सुदाम डेमसे, माजी नगरसेवक, पाथर्डी

हेही वाचा :

The post श्री शिवमहापुराण सोहळ्यात महिलांनी गमावले 60 तोळे दागिने appeared first on पुढारी.