संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर…; गुलाबराव पाटलांनी दिला इशारा

संजय राऊत, गुलाबराव पाटील, www.pudhari.news

जळगाव : उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यात येणार असून, त्यांचे येथे स्वागत आहे. मात्र त्यांच्या सभेत संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं ते जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेल असा इशारा शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास उद्धव ठाकरे व संजय राऊत हे 23 एप्रिल रोजी येणार आहेत. याठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. मात्र या सभेवरून गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, माझे मित्र आर. ओ. पाटील यांचे माझ्यावर फार उपकार आहेत. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर. ओ. पाटील आणि उद्धव ठाकरे यांचे पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत. पुतळ्याचे अनावर करण्यासाठी येत असतील, तर जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचे स्वागत आहे. पण, सभेत संजय राऊतांसारखा माणूस माझ्यावर बोलत असेल, तर मी पोलिस अधीक्षकांना पत्र देणार आहे. त्यांनी चौकटीत राहून बोलावे. अन्यथा मी सभेत घुसेल, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा :

The post संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर...; गुलाबराव पाटलांनी दिला इशारा appeared first on पुढारी.