सप्तशृंगी गडावर शाकंभरी नवरात्रोत्सवाला प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला गुरुवार (दि.१८)पासून सुरुवात झाली आहे.

आदिमायेच्या वणी गडावर चैत्र आणि नवरात्र हे दोन उत्सव उत्साहात पार पडत असतात. रविवारी सप्तशृंगी मातेच्या धनुर्मास उत्सवाची सांगता झाली आणि शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच महत्त्व असलेल्या शाकंभरी उत्सवास दुर्गाष्टमीला, गुरुवारपासून प्रारंभ झाला. येत्या २५ जानेवारीपर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे. या काळात देवीची पूजाअर्चा हाेऊन दही-भात व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आरती हाेते. शुद्ध नवमीस शाकंभर नवरात्राची सांगता होईल.

ज्या भाविकांना शारदीय नवरात्रोत्सवात काही कारणास्तव घटस्थापना करता येत नाही, त्यांनी शाकंभरी नवरात्रोत्सवात घटस्थापना केली तरी चालते, अशी श्रद्धा आहे. गडावर रोज सकाळी श्री भगवतीची पंचामृत महापूजा, दिवसभरात शांतीपाठ, देवीस्तुत्याचे पाठ व पठण होणार आहे.

प्रभू श्रीराम पंचायतन याग

विशेष म्हणजे, यंदा अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून दि. २१ ते २५ जानेवारीपर्यंत पंचदिनात्मक श्रीराम पंचायतन यागदेखील आयोजित केला आहे. भाविकांनी या उत्सवाचादेखील लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व पुरोहित संघाने केले आहे.

हेही वाचा :

The post सप्तशृंगी गडावर शाकंभरी नवरात्रोत्सवाला प्रारंभ appeared first on पुढारी.