साक्री तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

मंजुळा गावित,www.pudhari.news

पिंपळनेर:(ता ‌साक्री)पुढारी वृत्तसेवा; शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत साक्री तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार मंजुळा गावीत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

आ. गावित यांनी म्हटले आहे की, संपुर्ण महाराष्ट्र राज्यात शासनाने 40 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत केले आहेत. त्यात धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. साक्री, शिरपूर, धुळे हे तिन्ही तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात साक्री तालुक्यात सरासरी पर्जन्यमानापेक्षा अतिशय कमी पाऊस झालेला आहे. साक्री तालुक्यातील शेतजमीन हि पाण्याचा निचरा करणारी आहे. त्यामुळे पाऊस पडून देखील पाणी इतरत्र वाहून जाते. 12 महसुल मंडळात पाऊस जास्त झालेला आहे. खरीप हंगामातील सर्व पिके कापूस, सोयाबीन, मका, भूईमुग, बाजरी, पावसाळी कांदा या पिकांचे उत्पन्न अतिशय कमी आलेले आहे. तसेच पिक आणेवारी देखील 50 टक्क्यांपेक्षाही कमी घोषीत झालेली आहे. तालुक्यातील शेतकरी अत्यंत हवालदील झालेला आहे. माळमाथा, काटवाण परीसरातील विहीरींनी तळ गाठलेला आहे. आत्तापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. साक्री तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यात करावा म्हणून माझ्या मतदार संघातील दहिवेल येथील ग्रामस्थांनी दि.2 नोव्हेंबर पासून उपोषण सुरु केले होते. सदर कार्यकर्त्यांची उपोषण स्थळी आ.गावितांनी स्वतःतहसिलदार साहेबराव सोनवणे, सपोनी मोतिराम निकम, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गांगुर्डे व अन्य सहकाऱ्यांसह भेट देऊन त्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचविण्याचे आश्वासन देऊन त्यांना उपोषणापासून परावृत्त केले व त्यांनी देखील माझ्या आश्वासनास दाद देऊन उपोषण मागे घेतले आहे. साक्री तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा म्हणून समक्ष भेटून निवेदन दिलेले आहे. उपोषणकर्त्यांनी मागणी केल्या प्रमाणे व माझ्या मतदार संघातील वस्तूस्थिती लक्षात घेता शासनाने घोषित केलेल्या तालुक्यांच्या यादीत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचा समावेश करुन शेतकरी वर्गास न्याय द्यावा, अशी मागणी आ. मंजुळा गावित यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा :

The post साक्री तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी appeared first on पुढारी.