सुनील कोतवाल, जितू ठक्कर, उमेश वानखेडे, गौरव ठक्कर यांची निवड

क्रेडाई www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वांत मोठी संस्था असलेल्या क्रेडाईच्या २०२३ ते २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, त्यात नाशिक क्रेडाई मेट्रोच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. सुनील कोतवाल यांची राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रीय सल्लागार समिती (घटना)चे प्रमुख जितू ठक्कर यांची फेरनिवड, उमेश वानखेडे यांची सहप्रमुख स्किल डेव्हलपमेंट, तर गौरव ठक्कर यांची क्रेडाई युथ आणि वुमन विंगचे राष्ट्रीय प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे, तर राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथे झालेल्या पदग्रहण समारंभात आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. तीन दशकांपूर्वी नाशिकमधून सुरू झालेल्या क्रेडाई देशभरातील २१७ शहरांत विस्तारली असून, तेरा हजारांपेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक क्रेडाईशी जोडले आहेत. महाराष्ट्र राज्यात क्रेडाई विविध सहा झोनमधील सुमारे ६० शहरांत विस्तारली असून, तीन हजारांपेक्षा अधिक सदस्य आहेत.

हेही वाचा:

The post सुनील कोतवाल, जितू ठक्कर, उमेश वानखेडे, गौरव ठक्कर यांची निवड appeared first on पुढारी.