‘होमेथॉन’मधून घराचे स्वप्न साकार करण्याची संधी

होमेथॉन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– मुंबई-पुण्यानंतर नाशिकनेही विकासाची गती धरली आहे. धार्मिक नगरी, सांस्कृतिक नगरी, वाइन कॅपिटल, एज्युकेशन हब, विपुल निसर्ग सौंदर्य, वर्षभर आल्हाददायक वातावरण, मुबलक पाणी यामुळे गुंतवणुकीसाठी उत्तम शहर म्हणून नाशिकची निवड केली जाते. अशा या नाशिक नगरीत स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे २१ ते २५ डिसेंबरदरम्यान गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर ‘होमेथॉन २०२३’ या गृहप्रदर्शनाचे आयोजन केले असून, गृह स्वप्न साकार करण्याची उत्तम संधीच उपलब्ध करून दिली आहे.

‘होमेथॉन २०२३’ च्या माध्यमातून नाशिकमधील गंगापूर रोड, कॉलेजरोड, महात्मानगर, सातपूर, आडगाव, हिरावाडी, गोविंदनगर, काठे गल्ली, नाशिकरोड, पंचवटी, वडाळा, पाथर्डी फाटा, त्र्यंबक रोड, म्हसरूळ आदी भागात गृह खरेदीचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यंदाच्या एक्स्पोचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मुंबई येथील रूणवाल बिल्डर्सचा स्टॉल या प्रदर्शनात असणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे येथील प्रापर्टीचे पर्यायही उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे अकोला, यवतमाळ, नागपूर येथील बांधकाम व्यावसायिकांचेही गृहप्रकल्पांचे स्टॉल्स येथे असतील. गेल्या वर्षीच्या होमेथॉनच्या माध्यमातून ३४२ सदनिकांची विक्री करण्यात आली होती. यंदा पाचदिवसीय प्रदर्शनात स्पॉट बुकिंग करणार्‍या प्रत्येक ग्राहकाला एक चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स असून, पॉवर्ड बाय रूंगटा ग्रुपचे ललित रूंगटा, सह प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच एलआयसी हौसिंग तसेच ऑनलाइन पार्टनर म्हणून हौसिंग डॉट कॉमचे सहकार्य लाभले आहे.

प्रदर्शनात घर घेऊ इच्छिणार्‍या ग्राहकांना विविध बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे एकाच छताखाली गृह खरेदीचे स्वप्न साकार करता येईल. – जयेश ठक्कर, मुख्य समन्वयक, होमेथॉन एक्स्पो

हवाई, रेल्वे, रस्तेमार्गे दळणवळण यंत्रणांचा विकास झाल्याने नाशिकपासून इतर शहरे हाकेच्या अंतरावर आली आहेत. चौपदीकरणामुळे मुंबई, नाशिक अंतर अवघ्या दोन ते अडीच तासांचे झाले आहे. याशिवाय नाशिकमध्ये निओ मेट्रोसह अनेक प्रकल्प येत आहेत. त्यामुळे नाशिक वास्तव्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. – अभय तातेड, अध्यक्ष, नरेडको

वाहतुकीसाठी सुलभता, उत्तम हवामान, मुबलक पाणी, शहरापासून काही अंतरावर पर्यटनासाठी उपयुक्त ठिकाणे, मुंबई-पुण्यासारख्या शहरांच्या तुलनेत कमी महागाई विशेष म्हणजे आनंदी आणि आरोग्यदायी जीवनशैली या वैशिष्ट्यांमुळे नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढू लागला आहे. – सुनील गवादे, सचिव, नरेडको

हेही वाचा :

The post 'होमेथॉन'मधून घराचे स्वप्न साकार करण्याची संधी appeared first on पुढारी.