10th Result 2024 : नाशिकचा निकाल ९५.२८ टक्के

दहावीच्या परीक्षेचा उद्या निकाल

नाशिक: पुढारी ऑनलाइन डेस्क वृत्तसेवा –  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. सोमवार (दि.२७) दिवस उजाडताच विद्यार्थ्यांना निकालाची आतुरता होती. तर दुपारी एक वाजेच्या काट्याकडे बघताना काहींची धडधड वाढत होती. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल बघितला.. आणि हुश्श म्हणत सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

बारावीप्रमाणेच यंदाही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलीच हुश्शार! असे म्हटले जात आहे. मुलींच्या उत्तीर्ण होण्याच्या टक्क्यात मोठी वाढ झाली असून मुलांपेक्षा दहावीच्या निकालात मुलीच वरचढ ठरल्या आहेत. तर नाशिक निकाल ९५.२८ टक्के इतका लागला आहे.

मुलांपेक्षा मुलीच हुश्शार!
मुलींचा निकाल – 97.21 टक्के
मुलांचा निकाल – 94.56 टक्के