नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
येथील यशवंतनगर परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरच्या स्फोटात पती-पत्नी भाजल्याची घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आता पतीचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाणी तापवण्यासाठी गॅस पेटवला असता सिलिंडरचा स्फोट झाल्याने विक्रम किसन आवारे (30) व त्यांच्या पत्नी गंभीररीत्या भाजले होते. त्यांना उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पत्नी 70-80 टक्के, तर पती 60 टक्के भाजले होते. काही दिवसांपूर्वी उपचार सुरू असताना पत्नीचा मृत्यू झाला. विक्रम आवारे यांचीही प्रकृती चिंताजनकच होती. शरीराच्या त्वचेवर तीन-चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. स्फोट झाला तेव्हा त्यांचा 4 वर्षांचा मुलगाही घरातच होता. मात्र, सुदैवाने तो बचावला. आवारे यांच्या मृत्यूची कागदपत्रे सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा:
- नाशिक : मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ईशान्येश्वराचे दर्शन
- प्रभाग रचनेचा आदेश हा न्यायालयाचा अवमान ; विधिज्ञांमध्ये चर्चा
- पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नाशिकच्या पश्चिमेला नागरिकांमध्ये घबराट
The post नाशिक : सावधान... ! सिलिंडर झाला स्फोट अन् दोघांनाही मृत्यूने कवटाळले appeared first on पुढारी.