नाशिक : नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरात असलेला जुना चांदवडकर वाडा कोसळला आहे. या घटनेत दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एका वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चार चाकी वाहन अशोक स्तंभावरील श्याम स्वीटस या दुकानात शिरले होते. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर काल सायंकाळी याच वाड्याचा काही भाग कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले होते.
अशोकस्तंभ हा शहरातील वर्दळीचा परिसर असल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. नाशिक शहरात अनेक जुने वाडे आहेत. या घटनेमुळे या जुन्यावाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा :
- सोमवारी जेजुरीत सोमवती, तर शनिवारी महाशिवरात्र यात्रा
- पुणे : मार्केट यार्डात गाळ्यांचे बांधकाम? कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार
- पुणे : 44 जोडप्यांनी साधला ‘व्हॅलेंटाईन डे’चा मुहूर्त; नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध
The post Nashik : अशोकस्तंभ परिसरातील जुना वाडा कोसळला appeared first on पुढारी.