नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार

आदिवासी विकास विभाग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शालार्थ प्रणालीमध्ये गैरमार्गाने यूजर आयडी वापरून ४७ लाख ४८ हजारांच्या अपहार प्रकरणानंतर आदिवासी विकास खडबडून जागा झाला आहे. नाशिक प्रकल्प कार्यालयामार्फत अपहार प्रकरणातील संशयितांची खातेअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच समिती गठीत करण्यात येणार असल्याचे समजते.

गेल्या आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील अनुदान आश्रमशाळेतील एका शिक्षकासह तिघांनी संगनमत करून शालार्थ प्रणालीमध्ये गैरमार्गाने यूजर आयडी वापरून वेतनदेयकाचे तब्बल ४७ लाख ४८ हजार ६६१ रुपयांची रक्कम परस्पर बँक खात्यात वर्ग केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर नाशिक प्रकल्प कार्यालयातील लेखा विभागाने तातडीने पावले उचलत संबंधित शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची रक्कम वसूल केली. तसेच अपहारासंदर्भातील सुमारे १५० कागदपत्रांची पडताळणी सुरू केली. अपहाराचे धागेदोरे नाशिक प्रकल्प कार्यालयातच असल्याचा संशयावरून यूजर आयडीचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांना पत्र दिले जाणार आहे. सायबर पोलिसांच्या तपासात अपहार प्रकरणाची सत्यता समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, शालार्थ आयडी प्रणाली सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या कार्यवाहीच्या चौकशीची मागणी आदिवासी संघटनांकडून केली जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार appeared first on पुढारी.