नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गावी जाणाऱ्या दुचाकीस्वार युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना दहावा मैल परिसरात घडली. सौरभ रावसाहेब अहिरे (२१, उमरे, ता. साक्री, जि. धुळे) असे या युवकाचे नाव आहे. सौरभ हा अमृतधाम येथील के. के. वाघ महाविद्यालयात बीबीएचे शिक्षण घेत हाेता. महाविद्यालयास उन्हाळी सुटी जाहीर झाल्याने ताे बुधवारी (दि.26) दुपारी साडेबारा वाजता दुचाकीने अमृतधाम येथून साक्रीच्या दिशेने जात हाेता.
आडगावलगत दहावा मैलजवळील राजस्थानी ढाब्याजवळ चारचाकी वाहनाने सौरभच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात त्यास जबर मार लागल्याने त्याचा भाऊ कमलेश अहिरे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅ. वैभव धूम यांनी तपासून मृत घोषित केले. आडगाव पाेलिस ठाण्यात अपघाताची नाेंद झाली आहे.
हेही वाचा :
- नगर तालुका : नागवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश; बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीला धक्का
- श्रीगोंदा : बापूंची तपश्चर्या धुळीस मिळवली : अण्णासाहेब शेलार
- कर्नाटक विधानसभा निवडणूक : देशाच्या पैशांवर काँग्रेसचा डल्ला; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा आरोप
The post नाशिक : उन्हाळी सुटी लागल्याने दुचाकीवर गावी निघाला, रस्त्यात मृत्यूने गाठलं.... appeared first on पुढारी.