नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी
तालुक्यातील शिक्षण विभागातील शेकडो पदे रिक्त असून, तालुक्यातील शालेय विद्यार्थांचा शैक्षणिक प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधीच शिक्षण विभागात कर्मचारी तुटवडा असताना यंदा तालुक्यातील ११२ प्राथमिक शिक्षक बदलून गेले, तर अवघे ६१ शिक्षक तालुक्यात आले आहेत.
राज्य सरकारकडून गुणवत्ता वाढविण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे दावे केले जातात. परंतु शिक्षण विभागातील रिक्त जागेची पोकळी सरकार भरून काढणार तरी कधी? हा प्रश्नच आहे. तालुक्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यासह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षकांची शेकडो पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाचा डोलारा हा प्रभारींच्या भरवशावर सुरू असल्याचे चित्र आहे. थोड्याच दिवसांत यंदाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात होणार असुन, या विभागातील रिक्त पदांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विभागाची दमछाक होणार आहे. तरी शैक्षणिक विभागातील रिक्त जागांवरील पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
तालुक्यातील एकूण जि.प. शाळा २११
पद मंजूर कार्यरत रिक्त
गटशिक्षण अधिकारी १ ० १
शिक्षण विस्तार अधिकारी ६ २ ४
केंद्रप्रमुख १३ ० १३
मुख्याध्यापक ३५ १४ २१
पदवीधर शिक्षक ८५ ३० ५५
उपशिक्षक ६२४ ४९७ १२७
वरिष्ठ सहायक १ ० १
विभागात जे अधिकारी-कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामध्ये शैक्षणिक नियोजन करत आहोत. परंतु रिक्त पदे भरण्यात आली, तर अजून शैक्षणिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल. – प्रमोद चिंचौले, प्रभारी गटशिक्षण अधिकारी, नांदगाव पंचायत समिती.
हेही वाचा:
- Cyclone Biparjoy : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ पुढील 24 तासांत होणार तीव्र; ‘या’ राज्यांना बसणार तडाखा
- IND vs AUS WTC Final : अश्विन की शार्दुल, कोणाला मिळणार संधी?
- पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी सेवा करण्याची भाविकांनी संधी
The post नाशिक : नांदगाव शिक्षण विभागातील जागा भरणार कधी? appeared first on पुढारी.