नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकात झोपलेल्या महिलेला गुंगीचे औषध पाजून रिक्षात बसवून निर्जनस्थळी घेऊन जात दोन नराधमांनी आळी-पाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड भागात घडली.
पीडित महिला मूळ गुजरातमध्ये राहणारी असून ती पतीपासून विभक्त झाल्याने माहेरी राहायला आली होती. आईसोबत भांडण झाल्याने ती नाशिक येथे राहणाऱ्या बहिणीकडे गुजरातमधून मुंबईत व त्यानंतर बुधवारी (दि. 21) नाशिक येथे आली होती. रात्रीचे 2 वाजल्याने ती स्थानकावरील प्लॅटफाॅर्म नंबर 2 वरील बाकावर बसलेली होती. तिची बहीण सकाळी घ्यायला येणार असल्याने पीडिता बाकावरच झोपली. मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्ती तिच्याजवळ आला व कोठे जायचे, असे विचारून मी सोडून देतो, असे सांगत बळजबरीने वडापाव खायला दिले. तसेच रिक्षात बसवत स्थानकाबाहेरील मेडिकलमधून काहीतरी औषध आणत बळजबरीने पाजल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. औषध प्यायल्याने महिलेला गुंगी आल्याने दोघांनी तिला चेहेडी येथे पेरूच्या बागेत नेऊन अत्याचार केला व पळून गेले.
दरम्यान पहाटेच्या सुमारास महिलेने बागेशेजारील इमारतीतील वॉचमनला घटना सांगितली असता, त्याने नाशिकरोड पोलिस ठाण्याला कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना ताब्यात घेतले असून, तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :
- राहुरी : बारागाव नांदूर ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला
- बेळगाव : पतीचा काढला काटा स्वतः, अन् म्हणाली ‘बेपत्ता’
- Heavy Rain In Madhya Pradesh And Assam : यूपी, आसामात पावसाचा कहर; ५ बळी, १३६६ गावे पाण्याखाली
The post नाशिक : 'ती' रेल्वेस्थानकात झोपलेली होती, दोघांनी निर्जनस्थळी घेऊन जात तिच्यावर... appeared first on पुढारी.