AMPC Election 2023 : सिन्नरला पहिल्या दोन तासात ‘इतके’ टक्के मतदान

बाजार समितीचा आखाडा akhada www.pudhari.news

नाशिक : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठी शुक्रवारी (दि. 28) मतदान होत आहे. नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव आणि येवला या बाजार समित्यांचे निकाल जिल्ह्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.

सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील मतदान होत असलेल्या बाजार समित्यांमध्ये नाशिक बाजार समितीसह  सुरगाणा, देवळा, घोटी, पिंपळगाव बसवंत, कळवण, येवला, नांदगाव, सिन्नर, दिंडोरी, चांदवड, मालेगाव आणि लासलगाव यांचा समावेश आहे. फक्त मनमाडला ३० एप्रिलला मतदान होणार आहे.

सिन्नर कृषी उत्पन बाजार समिती

माजी आमदार माणिकराव कोकाटे व माजी  आमदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सिन्नर बाजार समितीसाठी सकाळी 10 वाजेपर्यंत 22.4 % मतदान झाले आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती 

नाशिक बाजार समितीमध्ये माजी खासदार देवीदास पिंगळे आणि चुंभळे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. नाशिक, पिंपळगाव बसवंत, मनमाड, लासलगाव आणि येवला या पाच बाजार समित्यांचे निकाल जिल्ह्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती

सकाळी 10 वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान
1) सोसायटी मतदार संघ :- 153
2) ग्रामपंचायत मतदार संघ :- 123
3) व्यापारी मतदार संघ :-112
4) हमाल तोलारी मतदारसंघ :-29
एकूण झालेले मतदान :-417
झालेल्या मतदानाची टक्केवारी 17.89

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत एकूण २ हजार २७६ मतदारांपैकी २२१ मतदारांनी मतदान केल्याने १० टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी दिली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येथील भन्साळी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मतदान घेतले जात आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 वाजता मतदान घेण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी विकास पॅनल व राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना गट यांच्या महाविकास आघाडीच्या लोकमान्य परिवर्तन पॅनल तसेच अपक्ष उमेदवारांनी मतदान केंद्राच्या आवारात मोठी गर्दी केली आहे. यावेळी मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना उमेदवार हात जोडून विंनती करताना दिसत होते.

कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

कळवणमध्ये राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार व माजी आमदार जे. पी. गावित या दोघांच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत होत आहे.

सकाळी 8 ते 10 पर्यंत सोसायटी गट -129 / – ग्रामपंचायत गट – 89/ व्यापारी गट – 81 / हमाल मापारी – 32 मतदान झाले आहे.

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी आतापर्यंत 12% मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे.

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

मालेगाव कृउबासाठी यंदा तिरंगी लढत होत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील आपलं पॅनल, ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांचे कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल आणि शेतकरी संघटनांचे बाजार समिती बचाव पॅनल नशीब आजमावत आहे.

 

The post AMPC Election 2023 : सिन्नरला पहिल्या दोन तासात 'इतके' टक्के मतदान appeared first on पुढारी.