Artificial Limb Camp : दिव्यांग लाभार्थ्यांना होणार लाभ

कृत्रिम अवयव pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय सामाजिक न्याय आणि दिव्यांग सशक्तिकरण विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. १५) जिल्ह्यातील १ हजार ३९७ दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटप करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशात ६९ ठिकाणी सामाजिक अधिकारिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील कार्यक्रम कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. (Artificial Limb Distribution Camp)

कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार आहेत. तर नाशिक येथून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य, राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राज्याचे दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्ष बच्चू कडू, खा. हेमंत गोडसे, खा. डॉ. सुभाष भामरे यांसमवेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (Artificial Limb Distribution Camp)

कार्यक्रमाच्या अनुषंगाने गेल्यावर्षी जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरे घेण्यात आली होती. त्यातून एकूण २२८७ लाभार्थी पात्र ठरलेत, त्यापैकी जिल्ह्यातील नाशिक, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, देवळा, कळवण, सुरगाणा, पेठ, निफाड व येवला या १० तालुक्यातील १३९७ लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटप होणार आहे. तर, उर्वरित पाच तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना नंतरच्या टप्प्यात अवयव वाटप होणार आहे. (Artificial Limb Distribution Camp) भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) यांच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने इत्यादीचे वाटप होत आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आले आहेत.

हेही वाचा:

The post Artificial Limb Camp : दिव्यांग लाभार्थ्यांना होणार लाभ appeared first on पुढारी.