Bakri Eid : बकरी ईदनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल

वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बकरी ईदनिमित्त मुस्लीम बांधव सामूहिक नमाजपठण करण्यासाठी त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर जमतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत.

बकरी ईद गुरुवारी (दि. २९) असून, त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर शहरातील शेकडो मुस्लीम बांधव सामूहिक नमाजपठण करण्यासाठी येतात. त्यामुळे त्र्यंबक रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून, गर्दीमुळे वाहतूक कोंडीचीही समस्या उद्‌भवू शकते. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये व वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात येऊन, वाहतूक शाखेने पर्यायी मार्ग सुचवले आहेत. तशी अधिसूचना वाहतूक शाखेच्या उपआयुक्त मोनिका राऊत यांनी काढली आहे. वाहतूक मार्गातील बदल हे सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत राहतील. तसेच, पोलिस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका यांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.

बंद केलेले मार्ग

– त्र्यंबक नाका पोलिस चौकी ते मायको सर्कलपर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद असेल.

– गडकरी चौक ते मोडक सिग्नलपर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद असेल.

पर्यायी मार्ग

– मोडक सिग्नलकडून त्र्यंबककडे जाणारी वाहने सीबीएस, अशोकस्तंभ, गंगापूर नाका सिग्नल ते जुना सीटीबी सिग्नलमार्गे जातील.

– मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, संदीप हॉटेल, चांडक सर्कल, मायको सर्कलमार्गे जुन्या सीटीबी सिग्नलमार्गे त्र्यंबककडे वाहने जातील.

– चांडक सर्कलकडून गडकरी चौकाकडे जाणारी वाहने चांडक सर्कल, संदीप हॉटेल, गडकरी चौक, सारडा सर्कलमार्गे जातील.

हेही वाचा : 

The post Bakri Eid : बकरी ईदनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.