Bakri Eid : यंदा कुर्बानी नाही; मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण निर्णय

लासलगाव www.pudhari.news
नाशिक (लासलगाव) :  पुढारी वृत्तसेवा, लासलगाव येथील मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही महत्त्वाचे सण एकाच दिवशी आल्याने हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्या दिवशी बकरी कुर्बानी न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि.23) लासलगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मुस्लिम बांधव यांनी आयोजित केलेल्या बैठकीत लासलगाव सरपंच जयदत्त होळकर, उपसरपंच रामनाथ शेजवळ, माजी उपसरपंच अफजल भाई शेख व गुणवंत होळकर हे बैठकीला उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करताना लासलगाव सरपंच जयदत्त होळकर म्हणाले की, हिंदू व मुस्लिम या दोन्ही समाजाचे हे दोन्ही सण अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुस्लिम बांधवांनी मोठेपणा दाखवत दोन पावले मागे येत बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू समाजाचे वारकरी मोठ्या प्रमाणात पंढरपूरला पायी दिंडीत जातात. त्यामुळे दोन समाजात सलोख्याच्या भावना निर्माण होण्यास या निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे दोन समाजामध्ये  एकोपा होण्यास मदत होणार आहे.
बैठकीस सरपंच जयदत्त होळकर, उपसरपंच रामनाथ शेजवळ, गुणवंत होळकर, माजी उपसरपंच अफजल भाई शेख, तनवीर शेख, जमील कादरी, मौलाना फारुख, मौलाना मंजूर, मौलाना सलाउद्दीन, सलीम भाई मोमीन, राजू तांबोळी, मौलाना तौफिक अहमद, पिंपळगाव नजिक ग्रामपंचायत सदस्य लतीफ तांबोळी, अरुण भाई तांबोळी, राजू भाई शेख, मोहम्मद रफीक, अब्दुल कादिर, मौलाना हाजी अनीस, रफिक भाई तांबोळी, शमशुद्दीन कादरी, युनुस भाई तांबोळी,भिकन शेख, सलीम शेख यांच्यासम मुस्लिम बांधव उपस्थित होते. मौलाना मंजूर यांनी आभार मानले.

हेही वाचा:

The post Bakri Eid : यंदा कुर्बानी नाही; मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण निर्णय appeared first on पुढारी.