Nashik : वाढत्या गुन्हेगारीवर चौक बैठकांची मात्रा, पाेलिस-नागरिक थेट संवाद

पोलिस आयुक्तालय नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरासह उपनगरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चौक बैठकांवर भर दिला आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा दरारा निर्माण करण्यासह खबऱ्यांचे नेटवर्क सक्षम करण्यासाठी थेट चौकांमध्ये बैठका घेऊन नागरिकांसोबत संवाद साधण्याचे आदेश सर्व प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील बैठकांचे नियोजन पोलिस ठाणेनिहाय करण्यात आले आहे.

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सध्या पाेलिस रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. चौक सभेत नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर तोडगा शोधण्यासह अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील वाढता सहभाग कमी करण्यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संशयित व गुन्हेगारांची माहिती नागरिकापर्यंत पोहोचवून संशयिताबाबत अधिक माहिती संकलित करण्यात येत आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर होणारी अटक, न्यायालयीन प्रक्रिया, पोलिस कोठडी व मध्यवर्ती कारागृहातील रवानगीमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात येत आहे. बैठकांअंती तयार होणाऱ्या ‘मास्टर प्लॅन’मधून गुन्हेगारी नियंत्रण मिळविणे शक्य होणार असल्याचे पाेलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

ऑगस्टमध्ये होणाऱ्या चौक बैठका

पोलिस ठाणे-दिनांक-ठिकाण (दिनांकानुसार ठिकाण अनुक्रमे)

नाशिकरोड-५, १०, १९, २४ : अश्विनी कॉलनी सामनगाव रोड, गोसावी वाडी, पंचक शनिमंदिर, बागूलनगर, विहितगाव

उपनगर-३, १०, १८, २२ : सुराणा चौफुली देवळाली गाव, मुक्तिधाम, गांधीनगर पोलिस चौकी, मंगलमूर्तीनगर

देवळाली कॅम्प-५, १२, १९, २६ : समतावाडी भगूर, हाडोळा, देवळाली कॅम्प, शिवाजी चौक भगूर, सहा चाळ देवळाली कॅम्प

सरकारवाडा-१०, १७, २४, ३०-होलाराम कॉलनी, टिळकवाडी, गंगावाडी चोपडालॉन्स, तिळभांडेश्वर गल्ली

भद्रकाली-३, ११, १८, २८-साक्षी गणेश मंदिर, शिवाजी चौक नानावली, बनकर चौक काठे गल्ली, चौक मंडई

मुंबई नाका-२, ९, २३, ३०-म्हाडा कॉलनी शिवाजीवाडी, बजरंगवाडी, क्रांतिनगर, उंडवाडी रोड, रेणुकानगर, द्वारका

गंगापूर-२, ७, १४, २३-सिद्धार्थनगर, आकाशवाणी भाजी मार्केट, आनंदवल्ली चौक, येवलेकर मळा

पंचवटी- २, ९, १७, २३-कमलनगर, सरदार चौक, संभाजी चौक, दत्तनगर

म्हसरूळ-३, ११, १५, १७-म्हसरूळ गाव, एकतानगर, शांतिनगर, चाणक्यपुरी सोसायटी

आडगाव-३, १०, १७, २४- म्हाडा कॉलनी, कपिला संगम, गणेश मार्केट कोणार्कनगर, साईनगर नांदूरनाका

अंबड-३, १०, १७, २४ : घरकुल योजना, राजीवनगर, म्हाडा परिसर, दत्तनगर

इंदिरानगर-३, ८, १७, २३ : वडाळा, आनंदनगर, पाथर्डी, गामणे गार्डन

सातपूर-३, १०, १७, २४ : कार्बन नाका, सातपूर गाव, अशोकनगर चौक, माळी कॉलनी

The post Nashik : वाढत्या गुन्हेगारीवर चौक बैठकांची मात्रा, पाेलिस-नागरिक थेट संवाद appeared first on पुढारी.