Nashik : उकाडा वाढला! घामाच्या धारांनी नाशिककर हैराण

उन्हाचे चटके,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहर व परिसरात शुक्रवारी (दि.१४) सकाळी काहीकाळ उन्हाचा कडाकावगळता दिवसभर ढगाळ हवामान होते. या हवामानामुळे उकाड्यात प्रचंड वाढ होऊन नाशिककरांना घामाच्या धारा लागल्या. शहरात 38.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

गेल्या आठवड्यात नाशिकला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. मात्र, अवकाळीसह वातावरणाची चढ-उतार कायम असल्याने उन्हाचा चटकाही जाणवतो आहे. एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांमध्येच पारा थेट ३८.५ अंशांपर्यंत जाऊन ठेपला होता. परिणामी उन्हाने जिवाची लाहीलाही होत आहे. सकाळी साडेदहापासूनच उन्हाचा चटका जाणवत आहे. तसेच दुपारी १२ ते ४ यावेळेत उन्हाचा तडाखा सर्वाधिक असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. ग्रामीण भागातही उष्णतेचा प्रभाव जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांसह अन्य जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात ढगाळ हवामानामुळे उकाड्यात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

नाशिकचे तापमान

दिनांक – अंश सेल्सिअस

७ एप्रिल 35.8

८ एप्रिल 34.3

९ एप्रिल 36.7

१० एप्रिल 35.4

११ एप्रिल 38.5

१२ एप्रिल 37.8

१३ एप्रिल 37.8

१४ एप्रिल 38.1

हेही वाचा :

The post Nashik : उकाडा वाढला! घामाच्या धारांनी नाशिककर हैराण appeared first on पुढारी.