Nashik | एकलहरे परिसरात युवकाचा खून

नाशिक रोड : पुढारी वृतसेवा
येथील एकलहरे रोड परिसरात असलेल्या किर्लोस्कर कंपनीजवळ समोरच्या रस्त्यावर एका युवकाचा धारदार हत्याराने खून करण्यात आला. चेतन ठमके असे मृताचे नाव असून, खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

रविवारी (दि. १८) सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ही घटना समजताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, पोलिस निरीक्षक रामदास शेळके व सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खून झालेल्या ठमकेचे वय साधारण 30 ते 35 असून, तो विजयनगर, सिडको या भागातील राहणारा आहे. त्याचप्रमाणे या युवकाला या भागात कोणी आणले होते का?, तो स्वतःच आला होता याबाबतही पोलिस शोध घेत आहे. युवकाच्या अंगावर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले असून, दरम्यान या खून प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा:

The post Nashik | एकलहरे परिसरात युवकाचा खून appeared first on पुढारी.