Nashik : घोटी बाजार समितीत शेतकरी पॅनल विजयी

घोटी बाजार समिती

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या घोटी बाजार समिती निवडणुकीत लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवार विजयी झाले. तर शेतकरी परिवर्तन पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले.

लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनल नेतृत्व काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनी केले असून सोसायटी सर्वसाधारण गटातून निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने, महिला राखीव गटातून सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे, ओबीसी गटातून राजाराम बाबूराव धोंगडे, व्हीजेएनटी गटातुन ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने, व्यापारी गटातून भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा तर हमाल गटातून रमेश जाधव विजयी झाले. तर स्व. रामभाऊ शिरसाठ प्रेरित शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार दिलीप विष्णू चौधरी विजयी झाले.

एका जागेसाठी फेरमोजणीचा अर्ज आल्याने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. मतदान पेटीनिहाय मोजणी करण्यात आली. यावेळी समर्थकांना मतमोजणी कक्षात मोबाईल न्यायला बंदी घातली होती. घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक उपनिरीक्षक संजय कवडे, इगतपुरीचे उपनिरीक्षक राजाराम दिवटे आदींच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी जैन भवन येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी करत जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

 

The post Nashik : घोटी बाजार समितीत शेतकरी पॅनल विजयी appeared first on पुढारी.