Nashik : तरुणाची फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट, घोटीत तणाव

घोटी शहरात तणाव,www.pudhari.news

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या घोटी येथील एका तरुणाला फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकणं महागात पडलं आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्याबद्दल एका तरुणावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोएब मणियार रा. सुधानगर, घोटी असे या तरुणाचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल निलेश विलास साळवे यांच्या फिर्यादी वरून घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून काही काळ घोटी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घोटी पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र घोटी आणि इगतपुरी पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार होऊ न देता परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. या घटनेनंतर घोटी शहरातून पोलीसांनी रूट मार्च काढत नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या आपत्तीजनक पोस्ट ठेऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post Nashik : तरुणाची फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट, घोटीत तणाव appeared first on पुढारी.