Nashik : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे होणार विलीनीकरण

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड,www.pudhari.news

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा :

ब्रिटिशकालीन कायद्यावर चालत आलेल्या देशभरातील 62 कॅन्टाेन्मेंट बोर्ड बरखास्त करून त्या त्या राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये विलीनीकरण करण्याबाबत विचाराधीन असताना संरक्षण मंत्रालयाचे सहायक संचालक राजेश कुमार शहा यांनी काढलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड विलीनीकरण करण्याबाबत सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सात कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनास राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने यापूर्वीच पत्रक पाठवून याबाबत आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याबाबत लिखित सूचना केल्या होत्या. मात्र, याबाबत पाहिजे तशी कार्यवाही झाली नव्हती. मात्र, आता संरक्षण मंत्रालयाच्या सहायक संचालक राजेश कुमार शहा यांनी काढलेल्या आदेशानुसार राज्यातील औरंगाबाद , देहू रोड व देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विलीनीकरणाची प्रक्रिया करण्याबाबत स्पष्ट सूचना करीत यासाठी सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याची सूचना

महापालिका निवडणूक लक्षात घेता ऑक्टोबर 2023 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, तसेच मालमत्ता या संदर्भाने निर्णय घेण्यासाठी ही समिती मोलाची भूमिका बजावणार आहे. स्थापना करण्यात आलेल्या समितीला आपला अहवाल संरक्षण मंत्रालयाला दोन महिन्यांत सादर करावयाचा आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटचे विलीनीकरण हे निश्चित झालेले असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अशी आहे समिती

1) अध्यक्ष – संरक्षण मंत्रालयाचे सहसेक्रेटरी

2) सदस्य – राज्य सरकारचे प्रतिनिधी 3) ॲडिशनल डायरेक्टर जनरल (LWE), 4) ॲडिशनल डायरेक्टर जनरल (कॅन्टोन्मेंट) नवी दिल्ली, 5) डायरेक्टर डिफेन्स इस्टेट (सदन कमांड) पुणे 6) अध्यक्ष कॅन्टोन्मेंट बोर्ड 7) सेक्रेटरी : मुख्य कार्यकारी अधिकारी.

हेही वाचा :

The post Nashik : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे होणार विलीनीकरण appeared first on पुढारी.