Nashik : पिंपळदला अवकाळीच्या नुकसानीची ना. डॉ. भारती पवारांकडून पाहणी

डॉ. भारती पवार,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष पिकांचे तसेच घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लवकरच आर्थिक मदत जाहीर करतील. या आर्थिक मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. प्रत्येकाचे पंचनामे करा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

चांदवड तालुक्यातील पिंपळदसह परिसरात नुकसानीची पाहणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी डॉ. पवारांकडे टाहो फोडीत सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करून पुढील उदरनिर्वाहासाठी ठोस आर्थिक मदत देण्याची मागणी केली. ‘शेतातील पिकाची झालेली माती, राहत्या घराची पडझड बघता सांगा आता आम्ही जगायचे कसे?’ असा टाहो शेतकऱ्यांनी डॉ. पवारांकडे फोडला. यावेळी डॉ. पवारांनी शेतकऱ्यांना धीर देत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, ते लवकरच मदत देतील तुम्ही खचून जाऊ नका म्हणत शेतकऱ्यांचे सांत्वन केले.

यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, कृषी अधिकारी विलास सोनवणे, सचिन निकम, गोरख ढगे, अमर मापारी आदीसह शेतकरी बांधव, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post Nashik : पिंपळदला अवकाळीच्या नुकसानीची ना. डॉ. भारती पवारांकडून पाहणी appeared first on पुढारी.