Nashik : पोलिस भरतीची तात्पुरती निवड, प्रतीक्षा यादी जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक ग्रामीण पोलिस दलात झालेल्या पोलिस वाहनचालक व पोलिस शिपाई पदांच्या भरतीप्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात पोलिस अधीक्षक कार्यालयाने १७९ रिक्त पदांसाठी तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस दलात १७९ रिक्त पदांसाठी झालेल्या भरतीप्रक्रियेत २१ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यामध्ये १८ हजार ९३५ पुरुष आणि २ हजार ११४ महिला उमेदवार होते. त्यानुसार शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या आधारावर निवडप्रक्रिया झाली. २ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान मैदानी चाचणी झाल्यावर चालक व शिपाई पदाची लेखी परीक्षा नुकतीच पार पडली. शिपाई पदाच्या १६४ रिक्त जागांसाठी १८ हजार ९३५ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ११ हजार २४४ उमेवारांनी मैदानी चाचणी दिली. त्यातील ४ हजार ५१८ उमेदवारांनी २५ पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. त्यातून १ हजार ८६१ उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले. यापैकी आता १६४ उमेदवारांनी पोलिस दलात निवड झाली आहे. तर, १५ चालक पदांसाठी २ हजार ११४ प्राप्त अर्जापैकी १ हजार २४० उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. त्यापैकी १ हजार २२ उमेदवारांनी वाहन चालवण्याची चाचणी दिली. त्यातून निवडलेल्या १२४ उमेदवारांपैकी १२२ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. त्यापैकी अंतिम पंधरा उमेदवारांची निवड झाली आहे.

प्रतीक्षा व तात्पुत्या निवड यादीनुसार पात्र उमेदवारांमध्ये माजी लष्करी जवानांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे चालक म्हणून दोन महिलांची निवड झाली आहे. शिपाई म्हणून ५१ महिलांची निवड झाली असून, पोलिस अंमलदारांची चार मुले शिपाई म्हणून पात्र ठरले आहेत. तसेच शिपाई पदाच्या भरतीत प्रक्रियेत दहा उमेदवारांना एनसीसीचे अतिरिक्त ५ गुण देण्यात आले आहेत.

१४० गुणांचा उच्चांक

शिपाई पदभरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गात १४० गुण मिळवलेला उच्चांक ठरला आहे. तर ओबीसी व इडब्ल्यूएसमध्ये १३४, एससी प्रवर्गात १३३, व्हीजे-ए आणि एनटी-डीमध्ये १३२, एसटी आणि एनटी-बीमध्ये १३१, एसबीसीत १२४ तर एनटी-सीमध्ये १२९ गुणांचा उच्चांक आहे. तर चालक पदभरतीत खुल्या प्रवर्गात १४६ गुणांचा ‘टॉपर’ आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : पोलिस भरतीची तात्पुरती निवड, प्रतीक्षा यादी जाहीर appeared first on पुढारी.